पोस्ट्स

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा

इमेज
     प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दैनिक संचार प्रबोधन मंच, संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस २५०१ , द्वितीय क्रमांक १५०१  तृतीय क्रमांक १००१, चौथा क्रमांक ७५१ पाचवा,क्रमांक ५५१, सहा क्रमांक ५०१ रुपये तर  उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके अशी बक्षिसे आहेत.  ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ  विभागातील सर्व शाखांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी खुली असून  प्रत्येक महाविद्यालयास वरिष्ठ महाविद्यालयातील दोन आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे चार स्पर्धक पाठवता येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकास ऐन वेळेस विषय दिला जाईल.  विचार करण्यासाठी विद्यार्थ्यास पाच मिनिटे वेळ दिला जाईल आणि बोलण्यास पाच मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकांचे प्रवेश अर्ज  त्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत  पाठवावेत. स्पर...

संगमेश्वर कॉलेजला विद्यापीठाचा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक

इमेज
क्रीडा क्षेत्रातील सलग उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा झाला सन्मान सोलापूर क्रीडा प्रतिनिधी -   डॉ. पुरणचंद पुंजाल  चषक  प्रतिवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने  क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॉलेजला दिला जातो. विद्यापीठाने पुरस्कार सुरू केल्यापासून सलग  हा मान संगमेश्वर कॉलेजला मिळाल्याने  संस्थेच्या वतीने  क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  प्रारंभी डॉ. पुरणचंद पुंजाल चषक  घेऊन विद्यार्थ्यांनी मैदानावर जल्लोष केला. ही जल्लोषाची रॅली कॉलेजच्या मुख्य इमारती जवळ आली. तिथे सत्काराचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी केले. त्यात त्यांनी  संगमेश्वर कॉलेजच्या शिवाजी विद्यापीठापासूनच्या दैदीप्यमान परंपरेची माहिती देत. आपणही या  विभागाचे एकेकाळचे  खेळाडू होतो, याची  आठवण करून देत  क्रीडा विभागातील  सर्व यशस्वी खेळाडूंचे  अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ...

डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक सलग मिळवण्याचा मान संगमेश्वर कॉलेजला

इमेज
 क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाने  केला गौरव  --पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये यावर्षी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला पुरस्कार सुरू झाल्यापासून सलग डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील  प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे,प्रभारी क्रीडा  संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मान्यवर उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आनंद चव्हाण आणि यशस्वी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेजला उज्जवल, गौरवशाली क्रीडा परंपरा आहे. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणारे खेळाडू कॉलेजमधून घडलेले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी...

विद्यार्थ्यांनी अल्कोहोल इंडस्ट्रीतील नव्या संधींचा फायदा घ्यावा - उत्कर्ष भावसार

इमेज
संगमेश्वर मध्ये अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न सोलापूर प्रतिनिधी -  आजच्या काळात व्यावसायभिमुख शिक्षण महत्त्वाचे बनलेले आहे. कौशल्यावर आधारित कोर्सच्या माध्यमातून याची पूर्तता होते. अलीकडे साखर उद्योगाबरोबर अल्कोहोल इंडस्ट्रीज ही नवीन शाखा निर्माण झालेली आहे.  त्यामध्ये अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यांमध्ये नोकरीचा शोध घेण्याबरोबर अल्कोहोल क्षेत्रातील नव्या संधींचा फायदा घ्यावा असे विचार फ्रट्रेली कंपनीचे सहायक व्यवस्थापक  मा. उत्कर्ष भावसार यांनी मांडले.  संगमेश्वर कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ पासून सुरू केलेल्या पोस्ट् ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्डेस्ट्रीयल फर्मेनटेशन अल्कोहोल टेक्नॉलॉजी च्या पहिल्या बॅचच्या प्रमाणपत्र वाटप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी होते. या प्रसंगी सौ. श्रुतिका भावसार, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकार...

स्त्रियांनी खंबीरपणे अभिव्यक्त व्हावे – समीर गायकवाड

इमेज
संगमेश्वरमध्ये मराठी वाङ् मय मंडळाचे उद्घाटन सोलापूर प्रतिनिधी  ''आजच्या काळात स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहेत. त्यांचे जीवन नवनवीन समस्यांनी बाधित झालेले आहे. स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील अन्याय अत्याचारांच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. यासाठी स्त्रीने शिक्षित, सजग व जागृत होणे खूप गरजेचे आहे. त्याबरोबरच आपल्यावरील कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे तोंड देत, आपल्यावरील अन्यायाविरुध्द अभिव्यक्त झाले पाहिजे. त्याशिवाय पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मान मिळणार नाही.'' असे विचार प्रख्यात लेखक समीर गायकवाड यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मधील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. गायकवाड  यांनी स्त्रीजीवन आणि माझे लेखन या विषयाव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय समाजजीवनातील स्थान आणि त्याला उजागर करणा-या साहित्याचे चिंतन मांडताना व्यक्त् केले. भारतीय समाजात सातत्याने स्त्रीजीवनाला दुय्यम स्थान ...

बहारदार पाऊस गाण्यांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण

इमेज
 बहारदार पाऊस गाण्यांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ मराठी विभागाचा उपक्रम   काव्यवाचन, गायनातून साहित्याची गोडी लागते.                                                          - उपप्राचार्य  सुहास पुजारी   सोलापूर प्रतिनिधी '' कॉलेज जीवनात नेमून दिलेला अभ्यास करताना भाषेच्या साहित्य प्रकारांचा अभ्यास करता करता कवितेची गोडी लागते.  यमक, अलंकार याबरोबर ताल सूर जमून वाचिक  अभिनयआले की     कवितेची गोडी आपोआप लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक  श्रवणाचा आनंद घ्यावा लागतो.  कथा, कादंबरीचेही तसेच आहे. गोष्टीवेल्हाळ माणसांच्या गप्पा जेव्हा वाचनात येतात. तेव्हा वाचक  लेखकाच्या जडणघडणीचा आपल्या जीवनाशी संबंध लावून लावू लागतो. उत्सुकता वाढत जाते. मग उत्तम वाचनाचा प्रवास आपोआप होत जातो.''  असे मार्गदर्शन उपप्राचार्य प्रा.डॉक्टर सुहास पुजारी यांनी केल...