मराठी भाषा विदयार्थ्यांना जगण्याचे मार्ग दाखवते - प्रा.डॉ.इ.जा.तांबोळी
संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सोलापूर प्रतिनिधी - १२ जुलै - ''मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ज्ञान, संस्कृती, विचार आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणारी समृद्ध भाषा आहे. आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेचे महत्त्व अधिक वाढले असून विविध क्षेत्रांमध्ये मराठी जाणकारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. मराठी विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, पत्रकारिता, संपादन, वृत्तनिवेदन, आकाशवाणी व दूरदर्शन, प्रकाशन व्यवसाय, जाहिरात लेखन, अनुवाद, दुभाषी सेवा, पटकथा व संवाद लेखन, ब्लॉग लेखन, डिजिटल कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन, ई-लर्निंग, संशोधन, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भाषा तज्ज्ञ म्हणून काम करण्याच्या अनेक संधी आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) आणि मातृभाषेला मिळणारे वाढते महत्त्व यामुळे मराठी विषयातील तज्ज्ञांची गरज अधिक वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-पुस्तके, संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स आणि डिजिट...