इंटरनेटच्या आभासी युगात ऑनलाइन धोक्यांची जाणीव करून घ्या. पोलीस निरीक्षक - एस.एस.गजा


सायबर गुन्हे जागरूकतेविषयी  पोलिसांनी साधला  तरुणांशी संवाद 

सोलापूर शहर प्रतिनिधी 

''इंटरनेटच्या आभासी जगाला भौगोलिक, आर्थिक, सामाजिक असे कोणत्याही प्रकारचे बंधने नाहीत. हे आपण सारेच अनुभवतो आहोत. मात्र  पालक, घरातील प्रौढ व्यक्ती यांनाच 'ऑनलाइन' धोक्यांची व्याप्ती आणि तीव्रता याची जाणीव नसल्याने लहान मुले, विद्यार्थी  सहजपणे ऑनलाइन धोक्यांना बळी पडतात. सायबर सुरक्षा या विषयाबाबत काम करताना संपर्कात आलेल्या केसेस आणि अनुभवांवरून ऑनलाइनच्या आभासी जगातील सायबर धोके समोर आणून त्याची माहिती करून देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.पालकांना,   घरातील प्रौढ व्यक्तींना सर्वांत आधी ऑनलाइन धोक्यांची जाणीव करून द्या  आणि त्यापासून बचाव कसा करायचा हे शिकवणे ही आता काळाची गरज बनली आहे.''

असे मत कॉलेजेचे माजी विद्यार्थी मा.एस.एस.गजा ( पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा )  यांनी मांडले. संगणक विज्ञान विभागाने सायबर गुन्हे जागरूकता विषयी अतिथी व्याख्यान आयोजित केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  ए.ए.नळेगावकर (सहायक पोलीस निरीक्षक ),  वसीम शेख,  प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, प्रा.ज्योती काडादी ( संचालक, संगणक विज्ञान विभाग) आदी उपस्थित होते.


 वसीम शेख यांनी सायबर क्राइम म्हणजे काय? आणि आपण कसे जागरूक असले पाहिजे? याविषयी प्रबोधन केले. सहायक पोलीस निरीक्षक ए.ए.नळेगावकर यांनी सायबर गुन्ह्यांच्या वास्तविक जीवनातील घटनांबद्दल चर्चा करून विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती करून दिली.  

 '' तुम्ही इंटरनेट वापरावे, पण इंटरनेटने तुम्हाला वापरू नये  यावर भर द्या.  सध्याचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात  कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे.आभासी जगामध्ये फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे  आणि विद्यार्थ्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवले जात आहे  यापासून आपण सावधानराहिले पाहिजे.''  असा आहे मोलाचा सल्ला सायबर क्राईम तज्ञ  गजा याने दिला.  

कार्यक्रम  शस्वीतेसाठी यांनी  प्रा.सौ.आर.व्ही.हुंडेकरी, प्रा.मा. बी.एस. बुक्का  (कार्यक्रम समन्वयक ) परिश्रम घेतले. याप्रसंगी संगणक व व्यवस्थापन शास्त्र शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.





९ सप्टेंबर २०२३ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'किताब और मैं' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा – मनोज राऊत

विद्यार्थ्याने जाणून घेतला भारतीय हवामान विभाग