पोस्ट्स

मार्च २७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल. - डॉ. ह.ना.जगताप

इमेज
  संगमेश्वर कॉलेजमध्ये अंतिम टप्प्यातील  'शिक्षक क्षमता वृद्धी ' प्रशिक्षण  सोलापूर प्रतिनिधी -''  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धोरणातील तरतुदींनुसार शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षक क्षमता वृद्धी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. म्हणून या प्रशिक्षणाचे नियोजन  करण्यात आले आहे. आपण नव्या बदलाला सामोरे जाऊन आपली वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.एकूणच क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल.'' असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांनी केले .ते राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था  यांच्याकडून आयोजित केलेल्या  माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या अंतिम सत्र प्रशिक्षणात बोलत ...