संगमेश्वरच्या त्वरीता खटकेची एनसीसी नॅशनल एयर रायफल स्पर्धेसाठी निवड
दैनिक संचार परिवार आणि कॉलेजच्या वतीने सत्कार सोलापूर ( दि.२० जुलै २०२४) जुलै मध्ये तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे एनसीसी विभागाच्या वतीने झालेल्या एयर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या 9 महाराष्ट्र एनसीसी बटालियनची कॅडेट सार्जंट त्वरिता खटके ही सहभागी झाली होती.पुढे इंदोर ,मध्य प्रदेश येथे होणाऱ्या जी.वी. माळवणकर नॅशनल एयर रायफल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल बोलताना त्वरिता म्हणाली'' मी मुळातच खेळाडू असल्याने या खडतर वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये मनापासून काम करत राहिले. हे यश मिळवताना मला मिळालेले गुरु आणि माझे आई वडील यांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले'' एप्रिल २०२४ पासून जवळपास सहा शिबिरातून व प्रशिक्षणातून तिची निवड झाली आहे. आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा आणि तिच्या मातोश्रींचा संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.श्री.शरणराज काडादी, दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास ...