सुलेखन अभिवाचनातून परिपूर्ण व्यक्ति मत्व घडते - श्रुतीश्री वडगबाळकर
संगमेश्वरमध्ये भाषा संकुलाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोलापूर दिनांक २१ ' '' सुलेखनातून सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. वाचिक अभिनय आपल्या भावनिक गोष्टींना साद घालते. या नावीन्यपूर्ण स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना शिकण्याची सुवर्णसंधी असते. त्याचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी अशा भाषिक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. त्यातून सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक आणि वांग्मयीन जाण निर्माण होते. सुलेखन, अभिवाचन स्पर्धांमधून परिपूर्ण व्यक्तिमत्व घडण्याला चालना मिळते.'' असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, पुणे. शाखा - सोलापूरच्या अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ.श्रुती श्री वडकबाडकर यांनी केले. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग भाषा संकुल आयोजित सुलेखन व अभिवाचन स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी उपस्थित होते. प्रारंभीर समन्वयकांनी कार्यक्रमाचे प्रास्तावि...