जागतिक पोषण सप्ताहाच्या अनुषंगाने फ्रुट अँड व्हेजीटेबल कार्विंग स्पर्धा संपन्न
संगमेश्वर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र प्रयोगशाळेचे अनावरण सोलापूर ( दिनांक ८ ) रोजी संगमेश्वर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्रविभागमध्ये जागतिक पोषण सप्ताह निमित्त फ्रुट अँड व्हेजीटेबल कार्विंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . संगमेश्वर महाविद्यालयाच्या आवारात नवीन तयार करण्यात आलेल्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचेही अनावरण हि या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. देसाई व संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोठे हे उपस्थित होते. प्रयॊग शाळेचे अनावरण त्याच्या हस्ते करण्यात आले ,आजच्या फास्ट फूड च्या युगामध्ये दैनंदिन जीवनामधून कच्या भाज्यांचा व फळांचा वापर आहारातून कमी होत आहे . हि गोष्ट लक्षात घेऊन फळांना आणि भाज्यांना जर काही युक्त्या करून आकर्षक आणि चवदार बनवता येते व त्याचा वापर आहारामध्ये सहज करता येतो. भारतीय आहारशास्त्रानुसार आपल्या आहारातील किमान १/६ भाग आपण कच्या भाज्या व फळांचे सेवन केले पाहिजे त्यातील असणार...