पोस्ट्स

ऑगस्ट २, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्राचीन भारतीय सांस्कृतिक परंपरा,वैद्यक ज्ञान संस्कृतमधून समजते सौ. शिल्पा कुलकर्णी

इमेज
संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात संस्कृत संभाषण वर्गाचा समारोप  सोलापूर ( दिनांक १ ) प्रतिनिधी - '' संस्कृत भाषेतून वाणी संस्काराबरोबरच  इतर  भाषांचा देखील विकास होतो.  प्राचीन भारतीय सांस्कृतिक परंपरा,वैद्यक ज्ञान संस्कृतमधून समजते.त्यामुळे आपण  संस्कृतीतील सुभाषिते, कविता  आणि ग्रंथ  वर्षानुवर्षे वाचत आलो आहोत.  या भाषेतील ज्ञान अगाध असून आयुर्वेदशास्त्रापासून  सर्वच शास्त्रांना  संस्कृत भाषा मदत करत आली आहे '' असे प्रतिपादन  सौ. शिल्पा कुलकर्णी दीक्षित यांनी केले.त्या  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित  संस्कृत संभाषण वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा. उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.  संस्कृत संभाषण वर्ग दिनांक 8 जुलै ते 31 जुलै कालावधीत संपन्न  झाला एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचा समारोप नुकताच  संपन्न झाला .समारोप सत्रात मध्ये संभाषण वर्गात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत आणि अभिव्यक्ती सादर केली. कार्यक्रमाची सुरुव...