संगमेश्वर कॉलेजमध्ये (AICRA ) पहिल्या रोबोटीक सेंटरची सुरुवात
सोलापूर ( शहर संचार प्रतिनिधी ) ऑल इंडिया कौन्सिल फॉर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन दिल्ली यांच्या मार्फत संगमेश्वर कॉलेजमध्ये ( AICRA ) पहिल्या रोबोटीक सेंटरची सुरुवात झालीय. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतिनिमित्त संस्थेचे सचिव धर्मराज काडादी साहेब यांच्या हस्ते स्किल सेंटरचे उदघाटन इलेक्ट्रॉनिक्स विभागात झाले. याप्रसंगी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी , प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई , Suvi Instrument कंपनीचे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख डॉ.एस.एम. तोडकरी , शैक्षणिक सल्लागार विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद दर्गोपाटील , भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शुभांगी साळुंके , उपप्राचार्य प्रसाद कुंटेआदी मान्यवर उपस्थित होते. AICRA ही एक केंद्रशासनाची रोबोटीक संदर्भात सर्व भारतातील शाळा , महाविदयालयामध्ये स्कील कोर्सेस राबवणारी संस्था आहे. तसेच या AICRA संस्थेमार्फत Suvi -Instrument होडगी रोड यांना रोबोटीक ॲन्ड ॲटोमेशन प्रशिक्षण देण्याकरीता सोलापूर जिल्हयासाठी प्रतिनिधी म्हणून नेमले आहे. या प्...