पोस्ट्स

ऑगस्ट १०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तके जीवनाची पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात - संतोष कुलकर्णी

इमेज
    कॉलेजच्या ग्रंथालय दर्शन उपक्रमातून दुर्मिळ ग्रंथांचा परिचय सोलापूर ( दिनांक 9 ) '' पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात त्यामुळे ग्रंथालयातील वैविध्यपूर्ण पुस्तकांचं   वाचन करणे हे आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आद्य कर्तव्य माना .    साहित्य , कला , शिक्षण , विज्ञान , तंत्रज्ञान , संशोधन या क्षेत्रातील   अगाध ज्ञान जाणून   घेण्यासाठी वाचनाकडे वळले पाहिजे. समृद्ध ग्रंथालयातील   पुस्तके   जीवनाला दिशा देतात.   त्यातून वाचनाचा   समृद्ध संस्कार रुजतो वाढतो. व्यक्तिमत्त्व विकासात भर घालणाऱ्या आणि ज्ञानसंपन्न करणाऱ्या ग्रंथांकडे मार्गदर्शक म्हणून पहिले पाहिजे.   स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात   ग्रंथ आपल्याला तत्कालीन    स्थलकालाची माहिती देतात. '' असा दिलखुलास संवाद मार्गदर्शक या नात्याने   सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी साधत होते.   निमित्त होते   संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) कनिष्ठ विभाग हिंदी विभागाच्या वतीने   आयोजित केलेल्या ग्रंथ दर्शन उपक्रमाचे. उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,   ग्रंथपाल विजयकुमार मुलीमनी   यांच्यास