संगमेश्वर मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
सोलापूर प्रतिनिधी ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित केले. प्र.प्राचार्य प्रा. डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी डॉ. प्रमोद दर्गोपाटील,प्राचार्य डी. एस. गोठे , प्रा. डॉ.राजकुमार मोहोरकर , उपप्राचार्य प्रसाद कुंटे, प्राचार्य सचिन गायकवाड, उपप्राचार्य दत्तकुमार म्हमाणे,आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या आगमनानंतर एनसीसी विभागाच्या सूचनेनुसार ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीतानंतर शिक्षण संकुलातील पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात अग्निविर साठी निवड झालेल्या कॉलेजच्या विद्यार्थी पालकांचा सन्मान करण्यात आला.