पोस्ट्स

ऑक्टोबर ७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षांमध्ये परिश्रमासोबत आत्मविश्वासपूर्ण अभ्यास महत्वाचा - आयइएस सन्मती कुरुकुटे

इमेज
संगमेश्वर कॉलेजच्या सिव्हिल सर्विसेस विभागात  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोलापूर प्रतिनिधी -  पारंपरिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणात वाचनाची गोडी लागली आणि त्यातून स्पर्धा परीक्षेचे विश्व समजले की आपला प्रवास सोपा होतो. महाविद्यालयीन जीवनातच अभ्यासक्रम जाणून घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध स्तरातील  स्पर्धा परीक्षांचा  आपण विचार केला की आपण कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो  याचे आकलन होईल.  आपण  आर्ट, सायन्स, कॉमर्स,  आयआयटी, जेईई -नीट  हे सारं काही करताना दिशादर्शक अभ्यासाच्या मागे लागले पाहिजे.  त्यातून  काळ, काम आणि वेगाचे गणित बांधत आपण कठोर परिश्रमासोबत वेळ आणि आत्मविश्वास पूर्ण अभ्यास केला की स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच  यशस्वी होता येते.''  असे प्रतिपादन एनटीपीसीचे संचालक, आयएएस सन्मती कुरकुटे यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजच्या सिव्हिल सर्विसेस विभागात आयोजित केलेल्या  मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर  प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा,  सिविल सर्विसेस विभागाच्या प्रा.वंदना भानप,एनसीसीचे तुकाराम साळुंखे उपस्थित होते. प्रारंभी व्याख्यानसत्