वाचनातून तरुण पिढी संवादी होईल –डॉ. शिवाजी शिंदे
संगमेश्वर कॉलेजमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम सोलापूर : वाचन ही एक कला आहे. तिचे संस्कार व्हावे लागतात. लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. परंतु अलीकडे तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात असून त्यांचे ग्रंथवाचन, वृत्तपत्रांचे वाचन कमी झालेले आहे. यातून संवाद हरवत चालला आहे. जेथे संवाद हरवतो. तेथे विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद संपवायचा असेल तर वाचन हा एक पर्याय आहे. वाचनातून तरुण पिढी संवादी होईल असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उपकुलसचिव व सुप्रसिध्द कवी डॉ. शिवाजी शिंदे यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमध्ये महाराष्ट्र् शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा ‘वाचन संकल्प् महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत सामुहिक वाचन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वा...