संगमेश्वर नाईट कॉलेजमध्ये जीएसटी प्रणालीवर यावर व्याख्यान
उद्योग, व्यवसायात वस्तू व सेवा कर ही बाब महत्त्वाची आहे डॉ.बाळासाहेब मालेगावकर संगमेश्वर नाईट कॉलेजमध्ये जीएसटी प्रणालीवर यावर व्याख्यान सोलापूर दिनांक 25 '' कोणत्याही उद्योगात व्यवसायात आर्थिक नियोजन करतो त्यासोबत असलेल्या वस्तू व सेवा कराची प्रक्रिया ही महत्त्वाची बाब आहे. उत्पादित वस्तू ग्राहक केंद्र बनवताना जीएसटी सोबत मूल्यांकन करावे लागते. असे प्रतिपादन डॉ.बाळासाहेब मालेगावकर ( राज्यकर उपायुक्त, वस्तू व सेवा कर, सोलापूर) यांनी केले ते संगमेश्वर रात्र महाविद्यालय वाणिज्य विभाग आयोजित व्याख्यानात जीएसटी प्रणालीवर बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य एस.डी.गोठे ,डॉ.व्ही. सी.अचकनळी आदी उपस्थित होते. प्रा.घनाते यांनी प्रास्ताविक केलं. परिचय प्रा.आर.एस. कोळी करून दिला. जीएसटीचे फायदे, त्याची वैशिष्ट्ये, याद्वारे ...