पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजला सलग पाचव्यांदा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक

इमेज
 क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाने केले सन्मानित --पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये यावर्षी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला सलग पाचव्यांदा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील पूर्व व्यवस्थान सदस्य श्री. अमित कुलकर्णी,   प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मान्यवर उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोटे, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आनंद चव्हाण, डॉ. शिवाजी मस्के, श्री. वैजू स्वामी आणि यशस्वी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेजला उज्जवलशाली क्रीडा परंपरा आहे. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश...

काकांनी उदार दृष्टिकोनातून संस्थात्मक कार्य केले. - प्रा. डॉ. सुहास पुजारी

इमेज
    कै. मेघराज काडादी स्मृतिदिन सोलापूर ( दिनांक 2 सप्टेंबर )  '' आदरणीय मेघराज काकांनी संस्थात्मक पातळीवर काम करताना साधी राहणी  व उच्च विचारसरणीचा अवलंब करून निर्मोही वृत्तीने काम केले. ते उच्च विभाग विद्याविभूषित होते .आप्पांच्या गांधीवादी विचारसारणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपुलकीने ते सगळ्यांना आपलेसे करून घेत. निस्पृह वृत्तीने आणि उदार दृष्टीकोनातून त्यांनी संस्थात्मक कार्य उभे केले.'' असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले. ते संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष कै. मेघराज काडादींच्या स्मृतीदिन प्रसंगी अभिवादन कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलत होते.  व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई उपस्थित होते.  प्रारंभी पुष्पहार अर्पण करून  शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.  प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी  शैक्षणिक कार्य करताना कॉलेजच्या कामकाजा संदर्भात त्यांनी केलेले मार्गदर्शन या संदर्भात आठवणींना उजाळा दिला . सूत्रसंचालन प्रा.डॉ.संतोष मेटकरी य...