पोस्ट्स

सप्टेंबर ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

' आधुनिक अवकाश नेत्र ' या विषयावर सारंग ओक यांचे व्याख्यान

इमेज
 कनिष्ठ महाविद्यालयातील  विज्ञान शाखेचा उपक्रम सॊलापूर ( दिनांक ७ सप्टेंबर ) आकाशातील चंद्र तारे सूर्यग्रहण किती आहेत याचा अभ्यास करू शकतो का ? एकच तारा दिसतो बाकीचे तारे का दिसत नाहीत ? ताऱ्यांची संख्या मोजू शकता का ? पृथ्वीवर सजीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली ? अशा अवकाशाविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे  सारंग ओक यांनी दिली. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित ' आधुनिक अवकाश नेत्र  ' या कार्यक्रमात बोलत होते.  याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य  प्रसाद कुंटे  उपस्थित होते.  प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्यांनी या अभिनव उपक्रमाविषयी कौतुक करत संवाद साधला.               हब्बल स्पेस टेलिस्कोप 38 वर्षांपूर्वी अवकाशात पाठवला गेला तो आजही कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वी  महिन्यापूर्वी जेम्स वेब  स्पेस टेलिस्कोप सोडला गेला. चंद्रयान ३ मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. चंद्रावरती पाणी आणि तेथील सजीवसृष्टीचा अभ्यास सुरूय.मानवी वास्तव्य होऊ शकेल का ? याचा अभ्यास सध्या लँडरच्या मदतीने सुरू आहे.असेही त्यांनी सांगितले