पोस्ट्स

एप्रिल १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थीदशेत निवेदन कलेतून भाषिक जाणीव निर्माण होते ---- प्रा.डॉ. सुहास पुजारी

इमेज
  ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निवेदनकला तंत्र व सादरीकरण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सोलापूर  ( दिनांक १३ )  '' विद्यार्थ्यांनो  कोणत्याही शाखेत करिअर करा मात्र उत्तम बोलता आले तरच तुमचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडते. निवेदन व सादरीकरण  ही कला अवगत होण्यासाठी पाठांतराचे मूल्य नाकारता येत नाही. उत्तम सकस वाचनही महत्वाचे आहे. थोरा मोठ्यांचे विचार, सुभाषिते, सुविचार, सुवचने यातून तसेच संत वचनातूनही उत्तम विचारांचे सादरीकरण आपण करू शकतो. आवाजाच्या दुनियेतील उत्तम कलाकारांचे निरीक्षण करा.'' असा सल्ला मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुहास पुजारी यांनी दिला. ते संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) विभाग कनिष्ठ विभागाच्या निवेदनकला  तंत्र आणि सादरीकरण या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मंचावर पर्यवेक्षक मल्लीनाथ साखरे, अभ्यासक्रम समन्वयक प्रा.अशोक निम्बर्गी  उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) विभाग कनिष्ठ विभागाच्या निवेदनकला  तंत्र आणि सादरीकरण या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुहास पुजारी  प्रारंभी प्