पोस्ट्स

डिसेंबर २१, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाज हितासाठी वैज्ञानिक जाणिवा ठेवून अभ्यास करा - सीईओ मनीषा आव्हाळे

इमेज
 दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन   सोलापूर ( दिनांक २१ ) " विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगांचा वापर हा समाजहितासाठी करावा. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग  जनतेचे जीवन समृद्ध करण्यासाठी झाला तर खऱ्या अर्थाने आपण विज्ञानाचा विद्यार्थी असल्याचं आपल्याला अभिमान वाटेल,म्हणून समाज हितासाठी वैज्ञानिक जाणिवा ठेवून अभ्यास करा  ''  असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केलं त्या संगमेश्वर कॉलेज व सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभात बोलत होत्या.  याप्रसंगी  सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास, प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,  कर्मयोगी कै. अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी  या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या मागचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांचा सत...