संगमेश्वर कॉलेजमध्ये वाय- 20 अंतर्गत स्पर्धांचे आयोजन
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम सोलापूर: जी-20 ही जगातील प्रमुख देशांची सर्वोच्च संस्था आहे. प्रत्येक वर्षी एक वेगळ देश याचे यजमानपद भूषवितो. 2023 मध्ये भारत देशाला हे यजमानपद मिळालेले आहे. ही अभिमानाची गोष्ट् आहे. जी-20 संघटनेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात देशातील नागरिक व युवकांचा सहभाग असावा. या धर्तीवर भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने युथ म्हणजे वाय-20 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धां घेण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयातील एकएक कॉलेजची निवड करण्यात आलेली असून सोलापूर जिल्हयातून संगमेश्वर कॉलेजला हा मान मिळालेला आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक ०२ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता संगमेश्वर कॉलेजमध्ये वक्तृत्व्, निबंधलेखन, गटचर्चा आणि पोस्ट्र प्रेझेन्टेशन इत्यादी स्पर्धा होणार आहेत. या समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र् शासनाच्या उच्च् शिक्षण सोलापूर विभागाचे सह संचालक डॉ. उमेश काकडे, जिल्हा माहिती अधिकारी मा. सं...