संगमेश्वर कॉलेजला विद्यापीठाचा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक
क्रीडा क्षेत्रातील सलग उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा झाला सन्मान सोलापूर क्रीडा प्रतिनिधी - डॉ. पुरणचंद पुंजाल चषक प्रतिवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॉलेजला दिला जातो. विद्यापीठाने पुरस्कार सुरू केल्यापासून सलग हा मान संगमेश्वर कॉलेजला मिळाल्याने संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी डॉ. पुरणचंद पुंजाल चषक घेऊन विद्यार्थ्यांनी मैदानावर जल्लोष केला. ही जल्लोषाची रॅली कॉलेजच्या मुख्य इमारती जवळ आली. तिथे सत्काराचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी केले. त्यात त्यांनी संगमेश्वर कॉलेजच्या शिवाजी विद्यापीठापासूनच्या दैदीप्यमान परंपरेची माहिती देत. आपणही या विभागाचे एकेकाळचे खेळाडू होतो, याची आठवण करून देत क्रीडा विभागातील सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ...