पोस्ट्स

जानेवारी २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘परीक्षा पे चर्चा’ पर्व ६ या उपक्रमांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेस संगमेश्वरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

इमेज
  जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद  ‘परीक्षा पे चर्चा पर्व सहा’ या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या  चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .आझादी का अमृत महोत्सव, बेटी बचाव बेटी पढाव, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत अभियान अशा एकूण दहा विषयांवर आपली चित्र विद्यार्थ्यांनी रेखाटली. या प्रसंगी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट दिली.  याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.