संगमेश्वरच्या वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेत हि.ने.कॉमर्स कॉलेजचा संघ विजेता
प्रश्नमंजुषा स्पर्धेतून वाणिज्य क्षेत्रातील संधींची ओळख होते. - विश्वशंकर चाकोते सोलापूर प्रतिनिधी - '' वाणिज्य शाखेतील प्रश्नमंजुषा स्पर्धेमधून वाणिज्य क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संधींची ओळख होते असे प्रतिपादन विश्व शंकर चाकोते यांनी केलं ''. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग वाणिज्य शाखेच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.वाणिज्य क्षेत्रातील कौशल्य आणि तंत्र आत्मसात करता यावे या हेतूने प्रतिवर्षी संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने बिझनेस क्विझचे आयोजन केले जाते. यात शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाचे 290 विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी मंचावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी , प्र.प्राचार्य राजेंद्र देसाई , उपप्राचार्य प्रसाद कुंटे , पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे , विभाग प्रमुख बसय्या हणमगाव आदी मान्यवर उपस्थित होते. निकाल याप्रमाणे- प्रथम - अजिंक्य भुतडा , मोहित तोष्णीवाल ( हि.ने.कॉमर्स कॉलेज) द्वितीय - यशराज तारापुरे , समर्थ स्वामी - (संगमेश्वर ...