मार्गदर्शनानुसार संच मान्यता झाल्यास अडचणी दूर होतील डॉ.ज्योती परिहार ( सोळंकी )

संगमेश्वरमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेचे वाटप सोलापूर दिनांक ७ - '' विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ या वर्षाकरिता कार्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संच मान्यता पूर्ण केल्याने कनिष्ठ महाविद्यालयाच्या अडचणी दूर होतील. कारण विद्यार्थी संख्या, रिक्त शिक्षक पदे, वेतन पथक यांच्याशी निगडित ही तांत्रिक बाब असल्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने ती व्यवस्थित करून आणून दिल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते.ज्या संचमान्यता बिनचूक पूर्ण झाल्या आहेत त्यावर स्वाक्षरी होऊन ज्या त्या महाविद्यालयांचा पुढचा मार्ग मोकळा केला आहे. विशेष म्हणजे वेळोवेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्फत परिपत्रकाद्वारे अनुपस्थित कनिष्ठ महाविद्यालयांना उपस्थित राहून संच मान्यता पूर्ण करण्यासाठी एकूण तीन वेळा संधी देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष शिबीरही लावण्यात आले. मात्र ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने अनुपस्थिती दाखवली आणि त्रुटी दूर केल्या नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा सूचना देऊन वेळोवेळी त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे.'' असे प्रत...