पोस्ट्स

डिसेंबर २०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरच्या वाणिज्य प्रश्नमंजूषेत जान्हवी आणि आयेशा प्रथम

इमेज
   महाविद्यालयीन युवकांनी उद्योग विश्वातील नवतंत्रज्ञान जाणावे     सीए सौरभ कोठारी सोलापूर  ( दिनांक २० )  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग वाणिज्य शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या 'बिझनेस क्वीझ २०२३' मध्ये संगमेश्वरच्या जान्हवी रोणे, आयेशा इनामदार यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक गणेश आंदोडगी, सुजय बोरना हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संघाने पटकाविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक - आर्यन जाजू, श्रावण खडलोया ( हिराचंद नेमचंद  कॉलेज ऑफ कॉमर्स ) द्वितीय उत्तेजनार्थ -   सचिन सणके, बाळू गुत्तीकोंडा ( कुचन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर) उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक - आदित्य पोटाबत्ती, वैष्णवी सगरशेट्टी  ( दयानंद कॉलेज ,सोलापूर) यांनी मिळवला. प्रमुख पाहुणे सीएस सौरभ कोठारी,  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य व श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी यांच्या हस्ते या विजेत्यांचा रोख रक्कम स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन  गौरव करण्यात आला. याप्रसंगी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवे...