पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परीक्षेला जाता जाता

इमेज
दैनिक संचार , सोलापूर आवृत्तीतील लेख  परीक्षेला जाता जाता परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करण्याबरोबरच उत्तरप्रत्रिका कशी लिहितो यावर आपल्याला किती गुण मिळणार हे अवलंबून असते. अभ्यास चांगला करूनही व्यवस्थित उत्तरपत्रिका लिहिली नाही तर चांगले गुण मिळू शकत नाहीत. म्हणूनच उत्तरपत्रिका चांगली लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याविषयी जाणून घेणे आवश्यक ठरते. आपल्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर ती शांतपणे वाचली पाहिजे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व्यवस्थित समजावून घेतले पाहिजे. अनेकदा प्रश्न व्यवस्थित न वाचल्याने त्याची उत्तरे आपण योग्य रीतीने लिहू शकत नाही. तसे झाल्यास आपल्याला चांगले गुण मिळू शकत नाहीत. प्रश्नपत्रिका वाचत असतानाच आपण उत्तरे कोणत्या पद्धतीने लिहिली पाहिजेत याचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. काही प्रश्नांची उत्तरे दीर्घ स्वरूपात लिहिणे आवश्यक असते; तर काहींची उत्तरे एका वाक्यात एका शब्दात लिहावयाची असतात. भाषा विषयांचे न सोडविताना काळजी घेणे आवश्यक असते. ज्या प्रश्नांकरिता अधिक गुण आहेत किंवा जे प्रश्न आपण लवकर सोडवू शकतो असेच प्रश्न हातात घेऊन लिहिण