पोस्ट्स

ऑगस्ट ९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजचे टेबल टेनिस स्पर्धेमध्ये यश

इमेज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  मुलींचा संघ उपविजयी व मुलांचा संघ तृतीय स्थान मिळवले मुलांच्या संघात समर्थ झिपरे, तानिष लवटे, महम्मदकैफ पटेल, मोहम्मदअल्ताफ शेख तर  मुलींच्या संघात श्रेया मिस्किन, पालवी ढेंगळे, नालंदा बाबर यांनी यशस्वी कामगिरी बजावली         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले  या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले टेबल टेनिस खेळाडू समवेत संस्थेच्या सचिवा ज्योती काडादी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे, प्रा.एन व्ही साठे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे...

योग्य नियोजन, कठोर मेहनतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो - स्वाती मोहन राठोड

इमेज
  UPSC मधून आयएएस उत्तीर्ण स्वाती राठोड यांचा संगमेश्वरमध्ये  सत्कार सोलापूर प्रतिनिधि  '' प्रशिक्षणाशिवाय UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जसे की UPSC परीक्षेचा नमुना, UPSC परीक्षा अभ्यासक्रम, UPSC मार्किंग योजना, UPSC परीक्षेसाठी पर्यायी पेपर कसे निवडायचे इ. सर्वोत्तम पद्धतीने. UPSC 3 टप्प्यांमध्ये परीक्षा घेते म्हणजे प्रिलिम, मुख्य आणि मुलाखती. प्रिलिम आणि मुख्य दोन्हीकडे जाण्याच्या धोरणासाठी केंद्रित अभ्यास आवश्यक आहे. UPSC प्रिलिम्स आणि मेन हे दोन एकमेकांपेक्षा खूप वेगळे नाहीत, हे फक्त अध्यायांचे एक मोठे ओव्हरलॅप आहे. उमेदवारांनी UPSC प्रिलिम आणि मुख्य दोन्हीसाठी एकत्रित तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. योग्य नियोजन, कठोर मेहनतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो ''  असे प्रतिपादन आयएएस उत्तीर्ण स्वाती मोहन राठोड  यांनी केले.  त्या संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या  त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होत्या.  व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसार कुंटे   कला शाखा समन्वयक शिवशरण दुल...

संगमेश्वरकॉलेजची सोलापूर महानगरपालिकेस भेट

इमेज
संगमेश्वर कॉलेजमधील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले.  भूगोलाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले नगर नियोजन, नागरीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी व नागरी समस्या  या विषयीचे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील घनकचरा संकलन आणि त्यांचे नियंत्रण  तसेच सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक यंत्रणेचे नियंत्रण याशिवाय सोलापूर शहर व हद्दवाढ परिसरामध्ये पाणीपुरवठ्याचे  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणारे ऑनलाईन नियंत्रणाची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.  नव्यानेच सुशोभीकरण करण्यात आलेली महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू याशिवाय महानगरपालिकेतील प्रशासकीय कार्यालय  विविध विभाग यांची सखोल माहिती  विद्यार्थ्यांना मिळाली.  सोलापूर शहराचा विकास, नगर नियोजनाचा इतिहास आणि वस्तुस्थिती यांची माहिती दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देण्यात आले. महानगरपालिकेचे सभागृह आणि महापौरांच...

साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे गैरसमजुतीतून मारू नका - अस्मिता बालगावकर

इमेज
 ' साप- श्रद्धा व अंधश्रद्धा आणि त्याबद्दची मानसिकता '  या विषयावर व्याख्यान सोलापूर दिनांक ८ प्रतिनिधी   ''सापाबद्दल काही अंधश्रद्धाही आहेत. यामध्ये नागाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात, साप धनाचे रक्षण करतो, साप पाठलाग करतो, साप पुंगीवर नाचतो, साप दूध पितो, असे गैरसमज लोकांमध्ये आहेत. तसेच विशिष्ट प्रकारच्या सापांमुळे धनलाभ होतो, अशी चुकीची समजूत आहे. साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही   साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे गैरसमजुतीतून मारू नका ''.  असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्ष आणि मानसोपचार तज्ञ अस्मिता बालगावकर यांनी केले.  त्या संगमेश्वर कॉलेज  कनिष्ठ विभाग मानसशास्त्र शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.  प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रकाश कतनाळे यांनी करून दिला.  प्रमुख पाहुण्यांचा  सत्कार उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी केला. त्यानंतर...

वन्यजीवांसोबत जंगलांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी - भरत छेडा

इमेज
वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान सोलापूर दिनांक ८ प्रतिनिधी   '' एखादे क्षेत्र जंगल मानण्यासाठी ते झाडांनी भरलेले असावेच असे नाही.  काही ठिकाणी स्थानिक वनस्पतींचा प्रकार विचारात न घेता, क्षेत्र कायदेशीररित्या जंगल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. एकंदरीत, जंगले हे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास, झाडे, झुडपे आणि विविध प्रकारच्या वनस्पतींची वाढ आहे जी दुर्दैवाने दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे जंगलाचे संवर्धन ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे जी आपण सर्वांनी उचलली पाहिजे.वन्यजीवांसोबत जंगलांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी आहे.''  असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक भरत शेडा यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज आणि नेचर कंजर्वेशन सर्कल सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ' वन्यजीव संरक्षण '   या  विषयाच्या   प्रबोधनपर कार्यक्रमात बोलत होते.  व्यासपीठावर विज्ञान विभाग प्रमुख विशाल जत्ती उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रमुख सुभाष पाटील यांनी केले.           ...

कॉलेज शिक्षणानंतर व्यावसायिकतेत इंग्रजी बोलण्याचे मूल्य अमूल्य आहे - अभियंता प्रियंका गांधी

इमेज
  संगमेश्वर कॉलेजमध्ये स्पोकन इंग्लिश कोर्सचे उद्घाटन  सोलापूर दिनांक ८ प्रतिनिधी   '' इंग्रजी ही ज्ञानभाषा असल्याने जगात तिचा वापर सर्वत्र होतोय त्यामुळे मातृभाषेबरोबरच इंग्रजीतून शिक्षण होणे आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान घेणे हे कष्ट साध्य असल्याने त्यात आपण पारंगत होऊन शकतो .त्यामुळे आपण जगाशी संवाद साधू शकतो, म्हणून  जीवन जगण्याच्या कलेबरोबर  आपण व्यावसायिक म्हणून जेव्हा  समाजात वावरतो तेव्हा इंग्रजी भाषेचे मूल्य अमूल्य आहे.'' असे प्रतिपादन  सॉफ्टवेअर अभियंता,  संवाद कौशल्यतज्ञ  प्रियांका गांधी  यांनी व्यक्त केले.  ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग येथे  स्पोकन इंग्लिश कोर्सच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.  अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रसाद कुंटे होते.            प्रारंभी प्रास्ताविक शिवराज देसाई  यांनी केले. पाहुण्यांची ओळख तेजश्री तळे यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले,'' इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने...