वाचनाला दिशा मिळाली की वक्ता होण्याचा मार्ग सुकर होतो. शुभांगी कुलकर्णी
हिंदी विभाग आयोजि वक्तृत्व स्पर्धेत सादिया शेख प्रथम सोलापूर प्रतिनिधी '' शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून आपण सतत वाचन केले पाहिजे या वाचनातून मनाचे भरण -पोषण तर होतेच महत्त्वाचे म्हणजे आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळत जातात. या संदर्भातून आपले बोलणे सहज सोपे आणि प्रभावी होऊ शकते. त्यासाठी वाचा. वाचल्याशिवाय पर्याय नाही. सूक्ष्म निरीक्षण शक्ती ही अत्यंत महत्त्वाच आहे. वाचनाला दिशा मिळाली की वक्ता होण्याचा मार्ग सुकर होतो. '' असे प्रतिपादन शुभांगी कुलकर्णी यांनी केले. त्या भाषा संकुलाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे , भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी आदी उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन झाले. सरस्वती पूजनानंतर प्रा. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक करून अतिथींचा परिचय करून दिला. अत...