पोस्ट्स

ऑगस्ट ११, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वातंत्र्यदिनानिमित्त संगमेश्वर मध्ये निबंध स्पर्धा संपन्न

इमेज
    सोलापूर प्रतिनिधी  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (स्वायत्त) कनिष्ठ विभाग  भाषा संकुल, मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन  सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी करण्यात आला होते. त्यामध्ये मी तिरंगा बोलतोय, माझे कॉलेज जीवन, रिल्स मनोरंजन की मनोभावना, लोकशाहीत युवकांची जबाबदारी, पाठ्यपुस्तकातील  प्रतिज्ञेचा मला समजलेला अर्थ हे विषय देण्यात आले होते.  या स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण 65 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.           प्रारंभी सर्व स्पर्धक नियोजित वेळेप्रमाणे डी १०६ सभागृहात उपस्थित झाले. संतोष पवार यांनी नियमावली सांगून प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेस प्रारंभ झाला. याप्रसंगी पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,  प्रा.अशोक निम्बर्गी, प्रा.साहेबण्णा निम्बर्गी, भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी, प्रा. प्रदीप आर्य उपस्थित होते.