संगमेश्वरच्या अभिवाचन, सुलेखन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद
कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा संकुलाचा अभिनव उपक्रम सोलापूर प्रतिनिधी संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभागाच्या भाषा संकुलाच्या वतीने आयोजित मराठी , हिंदी , इंग्रजी , कन्नड , संस्कृत या पाच भाषांमधील अभिवाचन सुलेखन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात शहरातील विविध महाविद्यालयातील ५१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अभिवाचनासाठी पाठ्यपुस्तकातील आपल्या आवडीची कथा-कविता , गद्य उतारा निवडण्यास विद्यार्थ्यांना संधी दिली होती .तीन मिनिटांच्या अवधीत विद्यार्थ्यांनी नाट्य उतारा , नामवंत साहित्यिकांच्या कथा-कादंबऱ्या यामधील उतारे , कविता , स्वरचित कविता , प्रबोधनपर लेख , विनोदी उतारे सादर करून उपस्थितांची माने जिंकली. शुद्ध आणि सुंदर हस्ताक्षर हे उत्तम व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असल्याने त्याचा विकास व्हावा या उद्देशाने सुलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे रेखीव लेखन पहावयास मिळाले. प्रारंभी सरस्वती पूजन पर्यवेक्षक उषा जमादार , संघप्रकाश दुड्डे (हिंदी विभागप्रमुख) डॉ...