पोस्ट्स

सप्टेंबर ८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

इमेज
 संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाकडून  हेरिटेज नेचर वॉकचे आयोजन कोणत्याही शहराला जाज्वल्य इतिहास असतो. सोलापूरला देखील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात  एक मोठा इतिहास लाभलेला आहे  चार दिवस स्वातंत्र्यपूर्व कालखंडात  स्वातंत्र्य उपभोगलेले हे शहर १९ व्या शतकात कसे होते. हे या वास्तूतून लक्षात येते. म्हणून  जुन्या वास्तू पाहणे आणि त्यांचा इतिहास जाणून घेणे हे आपण विद्यार्थी संशोधक म्हणून अवश्य केले पाहिजे. ऐतिहासिक वास्तू मधून सोलापूरचा इतिहास आपल्याला माहीत होतो. त्यामुळे  आपण  सोलापूरातील  ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन  त्यांचा इतिहास समजावून घेतला पाहिजे.  या हेतूने  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने  भूगोल आणि इतिहास  विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी  हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिका,धनराज गिरजी हॉस्पिटल व डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे   प्रत्यक्ष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज - नेचर वाक साठी एकूण 77 विद्यार्थी सहभाग झाले होते. रात्र महाविद्यालयाच्या प्रा.सोनाली गिरी या...

स्पर्धा परीक्षेतील यश सातत्यपूर्ण अभ्यासातूनच मिळते - वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे

इमेज
संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन  सोलापूर दिनांक 8 प्रतिनिधी  '' स्पर्धा परीक्षेत करिअर करताना  मिळालेल्या प्राप्त परिस्थितीतून कठोर परिश्रम करत आपण अभ्यास केला पाहिजे. परिस्थिती बिकट असली तरी  आपल्या ध्येयापासून विचलित न होता सतत प्रयत्नवादी राहिलो, तरच आपण या स्पर्धेच्या जगात टिकू शकतो. मोबाईल, इंटरनेटच्या जगात वावरताना आपला वेळ इतर गोष्टीत जात नाही ना ? यासाठी  काळ- काम आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. हे सरावातून साध्य होते. यासोबत आपली संवेदनशीलता आपण आपल्या वाचनातून, कृतीतून, बाह्य सामाजिक निरीक्षणातून टिकवली पाहिजे. उत्तम अधिकारी होताना स्पर्धा परीक्षेतील यश सातत्यपूर्ण नियोजनबद्ध अभ्यासातूनच मिळते.'' असा मौलीक सल्ला तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिला.  ते भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर  प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, भूगोल विभागप्रमुख डॉ, राजकुमार मोहोरकर उपस्थित होते.                         प्रारंभी दीप प...