संगमेश्वर कॉलेजमध्ये SVEEP स्वीप टीम - २४९ शहरमध्य विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मतदार जनजागृती
सोलापूर शहर प्रतिनिधी - संगमेश्वर कॉलेजमध्ये SVEEP स्वीप टीम - २४९ शहरमध्य विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. प्रारंभी नोडल अधिकारी कादर शेख यांनी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे मतदार नाव नोंदणी करता येते याविषयी सविस्तर संवाद साधला. त्यानंतर उपस्थित सर्व नव मतदार विद्यार्थ्यांना प्रकाश राचेटी यांनी मतदानाची शपथ दिली. त्यानंतर प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी या अभियानाबद्दल जिल्हा निवडणूक कार्यालयाचे जनजागृती अभियान बद्दल आभार मानले. संतोष खेंडे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. या मतदार जनजागृती अभियानामध्ये कादर शेख (नोडल अधिकारी २४९ विधानसभा मनदार संघ - शिक्षणाधिकारी प्राथमिक ) ,गोदावरी राठोड ( शिक्षण विस्तार अधिकारी ), स्वाती स्वामी ( शिक्षण विस्तार अधिकारी ) , संतोष खेंडे आनंद सामल अमोल भोसले,सचिन शिदोरे ,अ. रज्जाक बेदरेकर ,मल्लिकार्जुन हिरेमठ यांचा समावेश आहे.याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रस...