पोस्ट्स

ऑक्टोबर १९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यस्तरीय Aqua Regia Competition मध्ये ऋग्वेद देशमुख आणि सिकंदर बिराजदार विजेते

इमेज
 सोलापूर प्रतिनिधी -    Triumphant Institute of Management Education  वतीने  राज्यस्तरीय Aqua Regia Competition  घेण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली.यामध्ये  संगमेश्वर कॉलेजच्या संघातल्या ऋग्वेद देशमुख आणि  सिकंदर बिराजदार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पुरस्काराचे स्वरूप रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह  असे असून त्यांची निवड मुंबई येथे होणाऱ्या विभागीय  स्पर्धेसाठी झालेली आहे.    Triumphant Institute of Management Education    संस्थेच्या वतीने  ही शहरस्तरीय स्पर्धा प्रथम झाली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली . राज्यस्तरीय स्पर्धा सिम्बॉयसिस कॉलेजच्या  प्रांगणातील  सभागृहात संपन्न झाली.  या  प्रश्नमंजुषा स्पर्धेत  चालू घडामोडी, भारताचा आणि जगाचा भूगोल ,खेळ, चित्रपट  यासारख्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. Triumphant Institute of Management Education टाइम संस्था सोलापूर शाखेचे प्रमुख प्रा.आनंद जोशी यावेळी उप...

संगमेश्वर महाविद्यालयाची विभागीय तलवारबाजी स्पर्धेत ५ पदकांची कमाई

इमेज
सोलापूर, दि. १३ ऑक्टोबर- विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कनिष्ठ म हाविद्यालयाच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशी ५ पदकांची कमाई केली. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिवा ज्योती काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा. प्रसाद कुंटे आदींनी अभिनंदन केले. कामगिरी : सेबर: समृद्धी घाळे (सुवर्ण), श्रुतिका चव्हाण (रौप्य), श्रेयस तळभंडारे (सुवर्ण), व्यंकटेश खंडेलवाल (कांस्य). फॉईल सुमित जाधव (सुवर्ण).

संगमेश्वर कॉलेजचे मैदानी स्पर्धेमध्ये 18 मेडल

इमेज
         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहर स्तर मैदानी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या  खेळाडूंनी विविध प्रकारात 18 मेडल पटकावले          यामध्ये यश साळुंखे 110 हार्डल्स प्रथम ,चारशे हार्डलस तृतीय ,चारशे रिले प्रथम, शंभर रिले द्वितीय, मंथन जूटलिंगे  400 हर्डल्स द्वितीय चारशे रिलेप्रथम 110 हार्डलस द्वितीय ,गोसदेव काळे 800 मीटर 1500 मीटर धावणे प्रथम 400 रिले प्रथम,  सिकंदर बिराजदार चारशे रिले प्रथम,  ओंकार घोडके हाय जंप ट्रिपल जंप प्रथम , तेजस पवार हॅमर थ्रो प्रथम मुलींमध्ये पुनम उपासे लॉंग जंप प्रथम 100 रिले तृतीय, प्राची भरले 100 रिले तृतीय, प्रियंका तलवार 100मी. हार्डलस प्रथम, निकिता कुलकर्णी बांबू उडी प्रथम, वैभवी धोत्रे गोळा फेक तृतीय, समृद्धी बनसोडे थाळी फेक द्वितीय, , रक्षिता घुगरे 400 हर्डलस द्वितीय, नर्गिस उस्ताद 100 रिले तृतीय असे एकूण सर्व खेळाडूंनी 18 पथके मिळवले         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद च...

संगमेश्वर कॉलेजचा संघ हँडबॉल स्पर्धेत प्रथम

इमेज
         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय  शहरस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या  खेळाडूंनी विजेतेपद पटकावले          या संघामध्ये सुंदर कट्टीमनी, अभिषेक सिंग, ओम देवकांबळे, हर्षद माने, तेजस पवार, अजय जाधव, विजय जाधव, उमरान पेरमपल्ली, आर्यन सोनकांबळे, अनिकेत भोसले, ओम कोळी, सोहम लब्बा या खेळाडूने विजेतेपद पटकावून दिले         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.        या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले फोटोओळी   प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे ,शारीरिक शिक्षण संचालक ...