पोस्ट्स

डिसेंबर २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विज्ञान अकादमीच्या मानद सदस्यांची घोषणा

इमेज
 संगमेश्वरच्या प्रा.डॉ.दत्तकुमार म्हमाणे यांची   यंग असोसिएट व  युवा वैज्ञानिक म्हणून निवड    सोलापूर प्रतिनिधी  - महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे मानद सदस्य, फेलो आणि युवा शास्त्रज्ञ, असोसिएट्स २०२३  ची घोषणा नुकतीच करण्यात आली. विज्ञान अकादमी महाराष्ट्र राज्याची ही प्रमुख वैज्ञानिक संस्था असून १९७६ मध्ये राज्याला भेडसावणाऱ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक समस्यांच्या निराकारण्यासाठी या संस्थेची स्थापना केली गेलीय.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारात रस असलेले आणि महाराष्ट्राशी विशेष नाते असलेल्या शास्त्रज्ञांची फेलो व युवा वैज्ञानिक म्हणून निवड होते. सध्या अकादमीचे अध्यक्ष प्रा.जी.डी. जाधव आहेत उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एस. राधाकृष्णन आहेत. तर सचिवपदी प्रा.डॉ.  भरत काळे कार्यरत आहेत.   अकादमी दरवर्षी फेलो आणि तरुण सहयोगींना ( युवा वैज्ञानिकांना ) त्यांच्या उत्कृष्ट संशोधनाबद्दल नामांकनाद्वारे समाविष्ट करून सन्मान करते. कोथरूड पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी येथे अकादमीची वार्षिक सभा झाली. याप्रसंगी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना  मूल्याधरित ...

संगमेश्वरच्या रविकुमार मोरेची दिल्लीच्या प्रजासत्ताक संचालनासाठी निवड

इमेज
सोलापूर ( दिनांक २९ ) यंदाच्या २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी संगमेश्वर कॉलेजच्या ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचा कॅडेट जूनियर अंडर ऑफिसर रवीकुमार बालाजी मोरे याची निवड झाली आहे .जुलै २०२३ पासून जवळपास एकूण १० शिबीरांमधून अत्यंत खडतर प्रशिक्षणातून ही निवड झालेली आहे.  RDC परेडमध्ये निवड होणे ही एनसीसी मधील सर्वात गौरवाची व अभिमानाची बाब असते.आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय संचलनासाठी एनसीसी विभागातील छात्र मोरे याची दिल्ली येथे निवड  झाल्याबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा सर,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिकार्जून साखरे तसेच एनसीसी विभागप्रमुख मेजर चंद्रकांत हिरतोट ,कॅप्टन शिल्पा लब्बा , प्रा. तुकाराम साळुंखे यानी त्याचे अभिनंदन केले. तसेच 9 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल राजा माजी , कर्नल अनिल वर्मा ,सुभेदार मेजर गनबहादुर गुरुंग आणि सर्व  पी.आय स्टाफ यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.

एमएचटी- सीइटीच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा प्रा. प्रफुल्लचंद्र पवार

इमेज
संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात  व्याख्यानाचे आयोजन   सोलापूर ( दिनांक २८ ) ''विज्ञान शाखेतून पुढील शिक्षणासाठी पूर्वतयारी करताना एमएचटी सीइटी  सारख्या स्पर्धा परीक्षेत विषय कोणताही असो सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा आहे. त्यासाठी वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांनी करावे'' असे प्रतिपादन अहमदनगर कॉलेजचे गणिताचे प्रा. प्रफुल्लचंद्र पवार यांनी केले.  ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग गणित विभागाच्या वतीने आयोजित  व्याख्यानात बोलत होते.  पूर्वतयारी   एमएचटी- सीइटीची हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे  उपस्थित होते .  प्रारंभी कॉलेजच्या वतीने व्यक्त्यांचा सत्कार झाला. त्यानंतर स्मिता शिंदे यांनी प्रास्तावित केले. प्रास्ताविकानंतर सिद्धाराम विजापूर यांनी परिचय करून दिला. उपप्राचार्य यांनी आजच्या व्याख्यानाचे महत्त्व विशद करत आपलं मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गणित विषयाशी निगडित पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे प्रा. पवार यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यासपूर्ण संवाद साधला. शेवटी विद्यार्थ्यांनी वि...