पोस्ट्स

जानेवारी २२, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजमध्ये पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न

इमेज
सोलापूर दिनांक  - २० जानेवारी २०२५ संगमेश्वर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालय पालक शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे  होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा.मल्लिनाथ साखरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ शुभांगी सुरेश नागणे, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी दिशिता संगा यांची उपस्थिती होती.   याच सभेमध्ये आरटीओ कार्यालयाचे श्री बनसोडे आणि गावडे यांनी रस्ता सुरक्षा सप्तांतर्गत पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीविषयी आणि  स्वतःच्या सुरक्षेविषयी माहिती देऊन प्रतिज्ञा दिली. या सभेचे सभेचे सूत्रसंचालन सायबण्णा निम्बर्गी यांनी केले. तर उपस्थित यांचे आभार सौ संगीता म्हमाणे यांनी मानले. ही सभा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रा. शिवराज पाटील, प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. विश्वजीत आहेरकर यांचे सहकार्य लाभले. या सभेला बहुसंख्य पालक आणि शिक्षक उपस्थित होते.