मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शब्दविणा' भित्तीपत्रकाचे उद्घाटन
मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये ' शब्दविणा ' भित्तीपत्रकाचे उद्घाटन सोलापूर दिनांक १६ मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शब्दविणा' या भितीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या हस्ते झाले.याप्रसंगीउपप्राचार्य डी. एम. मेत्री ,मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.सुहास पुजारी, डॉ.महादेव देशमुख, हिंदी विभाग प्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. दादासाहेब खांडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. साखरे, भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहोरकर , डॉ. मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भित्तीपत्रक तयार करण्यामागचा उद्देश विभागप्रमुखांनी सांगितला. त्यात ते म्हणाले की,'' मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषेतून झालेल्या शिक्षणातूनच आपण साहित्याच्या वाटा निवडत असतो. ती संधी मराठी विभागाच्या ...