मसाप सोलापूर आयोजित "श्रावणधारा" जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा संपन्न
कविता हा अभ्यासपूर्ण व गंभीर साहित्यप्रकार : समीर गायकवाड विद्यार्थ्यांनी आपला आवडता साहित्यप्रकार काव्यलेखनाच्या संदर्भात सर्वप्रथम भरपूर वाचन केले पाहिजे. त्यानंतर त्या कविता समजून घेऊन चिंतन, मनन करून आपल्यामध्ये साहित्य प्रतिभा रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तदनंतर काव्य लेखन हे अधिक चांगले व निश्चितच गुणवत्ता पूर्ण होईल. कविता-काव्यलेखन हा अभ्यासपूर्ण व गंभीर साहित्य प्रकार असून त्यासाठी वाचन व साहित्य व्यासंग असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उद्घाटक ज्येष्ठ ब्लॉगर लेखक समीर गायकवाड यांनी श्रावणधारा या मसाप आयोजित जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर मसापच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, कार्याध्यक्ष किशोर चंडक, संगमेश्वर महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, कोषाध्यक्ष व युवा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, स्पर्धाप्रमुख प्रा. भीमगोंडा पाटील आदी उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाले. त्यावेळी सरस्वती स्तवन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. काटीकर यांनी...