शालेय वयात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा आहार महत्त्वाचा - डॉ.सोनाली घोंगडे
संगमेश्वर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सोलापूर प्रतिनिधी ' 'शालेय वयात योग्य आहार हेच औषध म्हणून गुणकारी ठरते . चांगल्या व्यायामाची पालकांनी सवय लावावी.योग्य आहाराची जोड द्यावी आठवड्यातून एकदा तरी लंघन करून फळे, भाज्यांचे रस, आवळा रस घेऊन आपले आणि पाल्यांचे शरीर शुद्ध करावे. शुद्ध पाण्याद्वारे दररोज शरीराची अंतर्गत सफाई करता येते. चुकीच्या जीवनशैलीचे अनेक विद्यार्थी शिकार होतात त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. त्यातून पुढे जाऊन मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते. मुळात आजार होऊच नये यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांची दिनचर्या करावी. व्यायाम व आहाराचे वेळापत्रक तयार करावे. हे आपल्याला सहज शक्य आहे. निसर्गोपचारातून आपले शरीर आपण चांगले ठेवू शकतो.शालेय वयात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा आहार महत्त्वाचा आहे '' असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ञ डॉ.सोनाली घोंगडे यांनी केले. त्या संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ उमा...