पोस्ट्स

ऑगस्ट १, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजमध्ये शहरस्तरीय क्रीडा शिक्षकांची सभा

इमेज
 जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्यावतीने शालेय शहर स्तरीय क्रीडा स्पर्धा बाबत क्रीडा शिक्षकांची सभा 170 क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत संगमेश्वर कॉलेजमध्ये संपन्न झाली. या सभेला जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सोलापूर मनपा क्रीडा अधिकारी एम. के .शहापुरे, संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य पी .एन. कुंटे ,त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी गणेश पवार, सत्येन जाधव, नदीम शेख, सुनील धारूरकर,तानाजी मोरे, सुप्रिया गाढवे, जयराज मुंडे, जिमखाना चेअरमन प्रा. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार उपस्थित होते.  याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार म्हणाले की, सोलापूरमध्ये 400 मीटर अथलेटिक्स सिंथेटिक मैदान, बॅडमिंटन हॉल त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी चार मजली वस्तीगृह वाढवण्यात येणार , स्पर्धेसाठी येणाऱ्या पंचांच्या मानधनांमध्ये तीनशे रुपये करू,क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळेचे , 100 क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हा व तालुका प्रशिक्षनाचे आयोजन,स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह सुसज्ज मैदान करणे, सरते शेवटी 1

विद्यार्थ्यांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,डेटा सायन्स या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्या. - डॉ. पंकज डोळस

इमेज
संगमेश्वर कॉलेजमध्ये व्यवस्थापन व  संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे स्वागत सोलापूर( प्रतिनिधी)  " व्यवस्थापन आणि संगणक शास्त्रात महाविद्यालयीन जीवनात अभ्यास करताना काळ, काम आणि वेगाचे भान ठेवले तर या क्षेत्रात आपण अव्वल राहाल. त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) , क्लाऊड कम्प्युटिंग, डेटा सायन्स या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्यावा. '' असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद कॉलेज व्यवस्थापनशास्त्र आणि संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंकज डोळस यांनी केलं . ते संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) मधील संगणक शास्त्र विभाग आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, विभागप्रमुख आणि संचालिका प्रा. ज्योती काडादी, प्रा.तारा काडादी -आळंद , आदी मान्यवर उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेज (ऑटोनॉमस) मधील संगणक शास्त्र विभाग आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी   बोलताना डॉ.पंकज डोळस  डॉ. डोळस पुढे म्हणाले की, " माहिती आणि तंत्रज्ञानातील