पोस्ट्स

फेब्रुवारी ५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

इमेज
संगमेश्वर बीबीए विभागात उद्योजकता कार्यशाळेत  तज्ञांचे मत सोलापूर प्रतिनिधी  - '' नोकऱ्या शोधत बसण्यापेक्षा स्वयंप्रेरणेने   आणि अनुभवाच्या बळावर उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा.   उद्योजक होण्यासाठी फक्त दृष्टी असणे गरजेचे आहे. सोबत बदलते तंत्रज्ञान , मार्केटिंगचे कौशल्य , सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशस्वी उद्योजक म्हणून आपण इतरांना नोकऱ्या देऊ शकतो. '' असे मत   संगमेश्वर कॉलेज व्यवस्थापनशास्त्र विभाग आयोजित उद्योजकता कार्यशाळेत   तज्ञांनी मांडले. याप्रसंगी प्र . प्राचार्य ऋतुराज बुवा , समन्वयक गौरव जुगदार आदी उपस्थित होते.                                प्राचार्य प्रा.डॉ.आर.पी.बुवा यांनी महाविद्यालयाच्या उद्योक क्षेत्रातील मान्यवर विदयार्थ्यांची उदाहरणे दिली. संगमेश्वरमधून शिक्षण घेऊन उद्योग विश्वात   कित्येक विद्यार्थी आज मितीला स्थिरावले आहेत असेही ते म्हणाले. भारताच्या समकालीन परिदृश्यात उद्योजकतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. MCED चे कार्यक्रम आयोजक राम सुतार यांनी , व्यक्तींनी त्यांच्या नोकऱ्यांसोबतच व्यवसायाच्या संधी शोधण्याची गरज अधो