पोस्ट्स

सप्टेंबर १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगी अप्पासाहेब जयंती.... आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित वक्तृत्व, रंगभरण व पत्रलेखन स्पर्धा संपन्न

इमेज
मुलांना आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या                                                                          - अभियंता अर्चिता ढेरे   सोलापूर ( शहर संचार दिनांक १६  ) '' पालकांनो सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचे आहे प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेत सामील होताना मुले मशीन न होता माणूस कसे बनतील याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. गुणवत्तेसाठी स्पर्धा जरूर करावी. मात्र त्याचा अतिरेक न करता मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या .ती नक्कीच यशस्वी बनतील.''  असे प्रतिपादन आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या अभियांत्रिकी विभागप्रमुख अर्चिता ढेरे यांनी केले.  त्या आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित आंतरशालेय रंगभरण, वक्तृत्व आणि पत्रलेखन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.  कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये होतात. याप्रसंगी व्यासपीठावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समिती सदस्या शितल काडादी, प्राचार्या प्रियंका समुद्रे , परीक्षक संजीव स