संपन्न आरोग्यासाठी प्राचीन आयुर्वेदातील ज्ञान जाणून घ्या - डॉ. संभाजी पाटील
विज्ञान आणि आयुर्वेद या विषयावर संगमेश्वरमध्ये व्याख्यान सोलापूर ( दिनांक ११ ) '' बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाला आरोग्य कडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी गतिमान परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जीवन व्याधीग्रस्त बनत चालले आहे संपन्न आरोग्यासाठी प्राचीन आयुर्वेदातील ज्ञान जाणून घ्या आणि त्याचा वापर करा वैज्ञानिक दृष्टीने आयुर्वेदातील बारकावे जाणून घेतले तर जीवन संपन्न होईल '', असे मत डॉ. संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे , विज्ञान विभाग प्रमुख रामराव राठोड उपस्थित होते. प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर कॉलेजच्या वतीने वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यानी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला ते पुढे म्हणाले की , '' योग आणि आयुर्वेद यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. काळ काम आणि वेगाबरोबर आपण काम करत राहिलो तर निश्चितच आपण इच्छित ध्येय गाठू शकतो. ...