पोस्ट्स

जुलै २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांनो उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे - सुवर्णा झाडे

इमेज
 संगमेश्वरमध्ये उद्योगविश्व आणि करिअर या विषयावर व्याख्यान  सोलापूर दिनांक 28 जुलै       ''कठोर मेहनत,सातत्य, जिद्द, चिकाटीच्या बळावर आपले करिअर आपण नक्कीच उभे करू शकतो . उद्योजकता ही सध्या काळाची गरज बनली आहे. रोजगार देणारे उद्योजक निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनातच दिशा ठरवली पाहिजे.उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे.त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे. उद्योग विश्वातील नवे प्रवाह,आर्थिक जोखीम  आपण  जाणून घ्या. '' असा मोलाचा सल्ला सुवर्णा झाडे -खेलबुडे यांनी दिला. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने माझं करिअर या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या 'करियर इन आंत्रप्रेन्यूरशिप' या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,  पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे उपस्थित होते. वाणिज्य विभाग प्रमुख बसय्या हणमगाव  यांनी आपल्या प्रास्ताविकात आर्थिक जगतात  जोखीम स्वीकारून जो नवे उद्योग उभारतो तोच या क्षेत्रामध्ये  सक्षम होऊ शकतो असे सांगत प्रास्ताविक केले. प्रा. संगीता म्हमाणे यांनी सूत्...