वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत डॉ.बी.जे.लोखंडे
संगमेश्वरच्या विज्ञान प्रदर्शनात ऋषिकेश, रितेश प्रथम सोलापूर दिनांक २१ डिसेंबर २०२४ वैज्ञानिक संशोधनातून अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा आपल्याला वरिष्ठ पातळीवरील सूक्ष्म संशोधनात होतो क्षेत्र कोणतेही असो त्यातील संशोधनात समस्या निराकरण होणारे प्रोजेक्ट तयार झाले पाहिजेत आपण कठोर परिश्रमाने संशोधनात कार्य करीत राहिलो तर नक्कीच राष्ट्राचे नाव उज्वल होईल संशोधनाला गती मिळेल कमी खर्चात कमी वेळेत गतिमान संशोधन झाले तर ते संशोधन शाश्वत राहील असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील पदार्थ विज्ञान विभागातील प्रा.डॉ. बी.जे. लोखंडे यांनी केले. संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि सायन्स सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, विज्ञान प्रदर्शन समन्वयक विश्वजीत आहेरकर, शाखा समन्वयक विशाल जत्ती, परीक्षक श्रीमती मुनाळे आदी उपस्थित होते. डॉ.लोखंडे पुढे म्हणाले की," ...