दैनंदिन आहारातील भरडधान्याचे महत्त्व ओळखा -- दिनेश क्षीरसागर (अन्नशास्त्रज्ञ )
संगमेश्वर कॉलेज व कृषी विभाग यांचा संयुक्त उपक्रम सोलापूर (दिनांक 11 एप्रिल ) '' दैनंदिन आहारातील भरडधान्याचे महत्त्व ओळखा आणि विषमुक्त शेतीसाठी आपल्या घरापासून सुरुवात करा. उत्तम आहार तेही नैसर्गिक आहार असेल तरच आपले यापुढील जीवन सुखकारक होईल.अन्यथा भविष्यातील मोठ्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.'' असे प्रतिपादन अन्नशास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी केलं. ते संगमेश्वर कॉलेज आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाककला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात आयोजित केलेल्या मुख्य व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मंचावर मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, मंडल कृषी अधिकारी कृष्णा थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त भरडधान्य पाककला महोत्सव आणि व्याख्यानाचे आयोजन केले होते . प्रारंभी कृषी विभागाच्या वतीने प्रास्ताविक झाले आणि संगमेश्वर कॉलेज ,कृषी विभाग यांच्य...