समर्पित भावनेने प्र.प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी कार्य केले
संगमेश्वर कॉलेजमध्ये सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोलापूर ( दिनांक ३० नोव्हेंबर) '' प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी समर्पित भावनेने केलेले कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे. '' असे गौरव उदगार संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी काढले. ते प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे निमंत्रित शैक्षणिक सल्लागार डॉ.प्रमोद दर्गोपाटील, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.गोटे,सौ.सौ माधवी देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर संस्थेच्या वतीने प्राचार्य प्र. डॉ.राजेंद्र देसाई यांचा सपत्नीक सत्कार झाला. त्यानंतर प्रा .डॉ.एस. एस. पाटील,प्रा.शहानुर शेख,डॉ.शुभांगी गावंडे, चंद्रकांत हिरतोट,डॉ. वंदना पुरोहित,डॉ.प्रमोद दर्गोपाटील ...