इस्रो आणि विज्ञान भारतीची ' स्पेस ऑन व्हील्स ' बस संगमेश्वरमध्ये
विश्व कल्याणासाठी विज्ञान या भूमिकेतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर प्रतिनिधी - संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ' विज्ञान हे विश्व कल्याणासाठी' या भूमिकेतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .विद्यार्थ्यांमधील विज्ञान बद्दलची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि वैज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी सोलापूर सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने दिनांक २० आणि २१ डिसेंबर रोजी कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या बी बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. शहर आणि जिल्ह्यातल्या इयत्ता दहावी मधील शिक्षकांसोबत २० व २१ डिसेंबर रोजी ११ ते ४ या वेळेत विज्ञान प्रदर्शनास भेट द्यावी तसेच इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या झालेल्या सामंज्यस्य करारानुसार या बसच्या भारतभर प्रवासाच्या नियोजनाचे दायित्व विज्ञान भारती या संघटनेला देण्यात आले आहे. विज्ञान भारतीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क करून त्यांच्या प्रांगणात या बसच्या प्रदर्...