निरोगी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे -संतुलित आहार -अंजली ठोंबरे

आहार आणि निरामय जीवन या विषयावर डायट वेळापूर संगमेश्वरच्या शिक्षक प्रशिक्षणात व्याख्यान सोलापूर दिनांक 20 प्रतिनिधी- ''आहार हा निरोगी जीवनाचा मूलभूत आधार आहे. संतुलित आहार घेतल्यास शरीर सुदृढ राहते आणि अनेक रोग टाळता येतात. आयुर्वेद, आधुनिक पोषणशास्त्र आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम साधून योग्य आहार घेणे आवश्यक आहे.संतुलित आहार म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतील असा आहार. यामध्ये प्रथिने, कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ (फॅट्स), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (मिनरल्स) यांचा समावेश असतो. याचा आपण संतुलित विचार करून व्यवस्थित नियोजन करावे.'' असे प्रतिपादन वेलनेस मास्टर क्लासच्या संचालिका ,आहार आणि निरामय जीवनशैलीतज्ञ अंजली ठोंबरे यांनी केले. त्या आहार आणि निरामय जीवन या विषयावर आयोजित संवाद सत्रात बोलत होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे डायटचे प्रा. प्रभाकर बुधाराम उपस्थित होते. त्यापुढे म्हणाल्या की '' नैसर्गिक व ताज्या पदार्थांचा समावेश करा. प्रक्रियायुक्त अन्न टाळा.मितभोजनाचा (योग्य प्रमाण...