पोस्ट्स

जानेवारी २६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या तंत्राचा अभ्यास महत्त्वाचा - वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे

इमेज
 संगमेश्वर कॉलेजच्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण सोलापूर प्रतिनिधी -    '' स्पर्धा परीक्षेत आयोगाचे बदललेले  तंत्र आपण आत्मसात केले तर नक्कीच आपण  स्पर्धा परीक्षेमध्ये  यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनातच आपण तयारीला लागली पाहिजे.  मायक्रो नोट्स पासून ते  वर्तमानपत्राच्या वाचनापर्यंत  कठोर नियोजन,  सातत्यपूर्ण अभ्यास  या बळावर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.'' असा विश्वास तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यक्त केला.  ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलत होते. मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे उपस्थित होते.   संगमेश्वर गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. विठ्ठल आरबळे यांनी  पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर  शिवशरण दुलंगे यांनी प्रास्ताविक केले . प्रास्ताविका नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. पाहुण्यांनी दिलखुलास संवाद साधत अनेक तपास कथांमधून...

वैशिष्ट्यपूर्ण समृद्ध भारतीय परंपरा कृतीतून जपूया उपप्राचार्य डॉ .सुहास पुजारी

इमेज
संगमेश्वर मध्ये बी.ए.सिव्हिल सर्व्हिसच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक दिन   सोलापूर प्रतिनिधी - '' भारताला समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे.ती अनादिकालापासून भारतीय लोक जपत आले आहेत.  आपण विद्यार्थी दशेत  वेगवेगळ्या पोशाखापासून, राज्या राज्यातल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे.  भारतीय प्रशासकीय सेवेत येताना, लोकप्रशासनाची अंमलबजावणी करताना  सांस्कृतिक गोष्टी जाणल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. या बाबी समजावून घेतल्या तर व्यक्तीच्या  व्यक्तिमत्त्वाची उत्तम जडणघडण होते.'' असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी केले.  याप्रसंगी वंदना भानप, विशाल राऊत, राहुल साळुंखे, रवींद्र म्हमाणे,नविता बल्लाळ,  महानंदा मोटगी आदी उपस्थित होते.  ते  संगमेश्वर कॉलेजमध्ये बी.ए.सिव्हिल सर्विसेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक दिनाच्या  कार्यक्रमात बोलत होते.   प्रारंभी गणरायाला वंदन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.  प्रास्ताविक वंदना भानप यांनी केले.त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. सत्कारानंतर...