पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांची निवड करा - राजशेखर शिंदे

इमेज
संगमेश्वरमध्ये उद्योजकता विकासावर वाणिज्य शाखेत मार्गदर्शन  '' वाणिज्य क्षेत्रातील ज्ञान घेताना आपण सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांचा अभ्यास केला, व्यवसायाला सचोटीची जोड दिली, तर सेवा क्षेत्रात उत्तम उद्योग उभारता येईल.  सेवा क्षेत्रातील नवनवीन उद्योग सेवा व्यवसायांची निवड करा'' असे प्रतिपादन राजशेखर शिंदे यांनी केलं. ते 'माझं करियर' अंतर्गत उद्योजकता विकास या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. मंचावर पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, वाणिज्य विभाग प्रमुख बसय्य्या हणमगाव उपस्थित होते.  प्रारंभी पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी  महाविद्यालयीन जीवनातील शिक्षणाबरोबरच उद्योग विश्वातील घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा असल्याच सांगितलं. त्यानंतर मार्गदर्शकांचा कॉलेजच्या वतीने सत्कार झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी सोलापुरातील शून्यातून उद्योगविश्वात भरारी मारणाऱ्या अनेक यशस्वी तरुणांची यशोगाथा सांगत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योग व्यवसायासाठी कसे सहकार्य केले जाते याबद्दल विवेचन केले.  ...

विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे – रजनीश जोशी

इमेज
  संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय  मंडळाचे उद्घाटन सोलापूर दिनांक ६  भाषा ही मानवी जीवनातील महत्त्वाचे संवादसाधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो. बोलणे आणि लिहिणे ही भाषेची महत्त्वाची कार्ये आहेत. यातील लेखन ही कला असून लिपीच्या माध्यमातून ती साध्य् होत असते. सर्जनशील लेखनासाठी अंत: करणात प्रेरणा निर्माण व्हायला हवी. वाचनातून लेखनाचे संस्कार होता. लिहिण्याची उर्जा मिळते. इतरांच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही. परंतु त्याचे अनुकरण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे. असे विचार ज्येष्ठ पत्रकार व लेखक रजनीश जोशी यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मधील मराठी वाङ्‌मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. जोशी यांनी विद्यार्थ्यांना भाषा, साहित्य्‌, समाज आणि संस्कृती विषयी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा अभिजातपणा सांगितला. सोलापूरजवळील कुडल...