विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'
संगमेश्वर कॉलेजच्या मराठी विभागाचा उपक्रम सोलापूर प्रतिनिधी 'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.' या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ओळींप्रमाणे निसर्गाची किमया पाहताना,अनुभवताना 'सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे' अशा सदाबहार पाऊस गाण्यांच्या सादरीकरणांनी विद्यार्थ्यांनी पावसावरील कवितांचा पाऊस पाडला. निमित्त होते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पाऊसगाणी सादरीकरणाचे. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला विभागप्रमुख शिवशरण दुलंगे वाणिज्य विभागप्रमुख बसय्या हणमगाव यांची उपस्थिती होती. प्रारंभीक तांत्रिक व सादरीकरणाच्या सूचना प्रा.संतोष पवार यांनी दिल्या. प्रा.अशोक निंबर्गी यांनी मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या काव्यवाचन आणि सादरीकरण उपक्रमाची माहिती देत प्रास्ताविक केलं.उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी कविता सादर करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कला वाणिज...